UC News

HDFC Bank : दुसऱ्या दिवशी ऑनलाईन सेवांमध्ये बिघाड; खातेधारकांना मन:स्ताप!

HDFC Bank : दुसऱ्या दिवशी ऑनलाईन सेवांमध्ये बिघाड; खातेधारकांना मन:स्ताप!

टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या नेटबँकिंग आणि मोबाईल बँकिंग अॅपमध्ये तांत्रिक अडचणी आल्या आहेत.

बँकिंग अॅप वापरता येत नसल्याने सलग दुसऱ्या दिवशी ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागला. महिन्याच्या सुरुवातीला तांत्रिक अडचण आल्याने लोकांना बिलांचा भरणा आणि अन्य व्यवहारात अडचणी येत आहेत. 


एचडीएफसी बँकेच्या नेटबँकिंग आणि मोबाईल बँकिंग अॅपमध्ये सोमवारी बिघाड झाला.  एचडीएफसी बँकेने आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करून माहिती दिली की, तांत्रिक कारणास्तव नेटबँकिंग सेवा काही काळ बंद झाली आहे. बिघाडाची कल्पना आम्ही ग्राहकांना आधीच दिली होती.


'तांत्रिक बिघाडामुळे आमचे काही ग्राहक नेटबँकिंग आणि मोबाइल बँकिंग अॅप लॉगइन करू शकत नाहीएत. आमचे तज्ज्ञ हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी काम करत आहेत आणि तुम्हाला लवकरच सेवा पूर्ववत करून देण्यात येईल.' असे बँकेच्या ट्विटमध्ये सांगण्यात आले.  


याआधी देखील एचडीएफसीने नवीन मोबाईल अॅप आणले होते, तेव्हाही ग्राहकांना याच प्रकारे अडचणींचा सामना करावा लागला होता. नवे मोबाइल अॅप सादर केल्यानंतर बँकेने जुना अॅप गुगल प्ले स्टोरवरून काढून टाकले होते, यामुळे लोकांना मनस्ताप सहन करावा लागला.

READ SOURCE
Open UCNews to Read More Articles